Zero Hour Sarita Kaushik : राजकारणातून विचारधारा लोप पावली? सत्तेसाठी नव्या समीकरणांची नांदी
Continues below advertisement
एबीपी माझाच्या (ABP Majha) 'संपादकीय भूमिका' या विशेष कार्यक्रमात, कार्यकारी संपादक सरिता कौशिक (Sarita Kaushik) यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर विश्लेषण केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये स्वबळाची भाषा सुरू झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 'निवडणुकीत विचारधारेला स्थान नाही. जे निर्णय घेतले जातात त्याला फक्त आणि फक्त सत्ताकारण जबाबदार आहे', असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. त्यांच्या मते, २०१९ पासून महाराष्ट्रात विचारधारेवर आधारित राजकारणाचा अंत झाला असून, केवळ सत्ता मिळवणे हाच राजकीय पक्षांचा मुख्य हेतू बनला आहे. विचार आणि मूल्यांशिवाय राजकारण झाल्याने सामाजिक अधःपतन, भ्रष्टाचार आणि लोकशाही व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे मतदारांनी अधिक सजग राहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement