Abhishek Ghosalkar Case : अंगरक्षकाच्या पिस्तुलातून माॅरिसने घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या
Continues below advertisement
Abhishek Ghosalkar Case : अंगरक्षकाच्या पिस्तुलातून माॅरिसने घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या मुंबईतील दहिसर परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा नावाच्या स्वयंघोषित नेत्याने हा गोळीबार केला, आणि त्यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. घोसाळकर आणि नोरोन्हा काल संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते. तब्बल ४० मिनिटं हे फेसबुक लाईव्ह चाललं. लाईव्ह संपत आलं तेव्हा मॉरिस खोलीतून बाहेर गेला, पिस्तुल काढलं, आणि पुन्हा खोलीत शिरुन घोसाळकरांवर गोळीबार केला. गोळीबारामुळे ते जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
Continues below advertisement