Abhijit Panse Meets Eknath Shinde : एक नेता शिंदेंच्या भेटीला, दुसरा फडणवीसांच्या, मनसेचा प्लॅन काय?

Continues below advertisement

Maharashtra Legislative Council Election 2024: मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) कोकण पदवीधर निवडणूकीसाठी उमेदवार रिंगणात उतरवला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेने अभिजीत पानसे (Abhijeet Panse) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज ठाकरेंच्या या खेळीमुळे भाजपची चांगलीच गोची झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Maharashtra Legislative Council Election)

मनसेचे अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. तसेच अभिजीत पानसे महायुतीचे उमेदवार आहेत की मनसेचे?, असे सवाल उपस्थित करण्यात येत आहे. याचदरम्यान अभिजीत पानसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. अभिजीत पानसे आणि मनसेचे खेडमधील नेते वैभव खेडेकर यांनी आज वर्षा निवास्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली?, मनसेच्या अभिजीत पानसे यांना एकनाथ शिंदे पाठिंबा देणार का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram