Maharashtra Kesari | केसरीच्या आखाड्यात धक्कादायक निकाल, अभिजीत कटके आणि बाला रफिक शेख स्पर्धेबाहेर | ABP Majha

हाराष्ट्र केसरी कुस्तीच्या आखाड्यात यंदा महाराष्ट्राला नवा विजेता मिळणार आहे. लातूरचा शैलेश शेळके आणि नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरनं यंदाच्या महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे. माती विभागाच्या फायनलमध्ये शैलेश शेळकेनं चुरशीच्या लढतीत कोल्हापूरच्या माऊली जमदाडेचा पराभव केला. तर मॅट विभागात हर्षवर्धन सदगीरनं पुणे शहरच्या अभिजीत कटकेवर सनसनाटी विजय नोंदवून किताबासाठीची फायनल गाठली. विशेष म्हणजे शैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर हे दोघंही पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचे पैलवान आणि अर्जुनवीर काका पवारांचे पठ्ठे आहेत. त्यामुळे आपापल्य़ा विभागातली अंतिम फेरी जिंकल्यावर हर्षवर्धवन आणि शैलेश दोघांनीही काका पवार यांना खांद्यावर उचलून घेत आखाड्यात फेरी मारली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola