Abhijit Adsul VS Navneet Rana : आम्ही आता गप्प राहणार नाही, अडसूळ यांचा राणांवर पलटवार

Continues below advertisement

Maharashtra Politics अमरावती : राज्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वात हायव्होल्टेज लढाई असणार्‍या काही मतदारसंघात अमरावतीचा (Amravati) समावेश आहे. कारण हा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत महायुतीसाठी (Mahayuti) काहीसा डोकेदुखी ठरल्याचे बोलले जात आहे. कारण महायुतीतील घटकपक्ष असेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि दर्यापुरचे माजी आमदार कॅप्टन अभीजीत अडसूळ (Navneet Rana) आणि माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यातील वाद वेळोवेळी उफाळून आला आहे.

दरम्यान, आता हाच वाद विधानसभा निवडणुकीतही बघायला मिळणार असल्याची शक्यता आहे. कारण नवनीत राणा यांनी परत एकदा नाव न घेता कॅप्टन अभिजित अडसूळ (Captain Abhijeet Adsul) यांच्यावर जोरदार टिका केली आहे. तर त्यांच्या टीकेला अभिजीत अडसुळांनी जोरदार पलटवार करत थेट महायुतीलाही इशारा दिला आहे.  एकदा आम्ही गप्प राहिलो, आता गप्प राहणार नाही. असे म्हणत महायुतीला अभिजीत अडसुळांनी इशारा दिला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram