Abhijeet patil meet Pravin Darekar after IT raid : आयकर खात्याच्या छाप्यानंतर अभिजीत पाटील-दरेकर भेट
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आज धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांची भेट घेतली. अभिजीत पाटील यांच्या धाराशिव साखर कारखान्यावर आयकर खात्यानं टाकलेल्या छाप्यानंतर या भेटीला महत्त्व आहे. २५ ऑगस्टला आयकर खात्यानं सुरु केलेली कारवाई काल रात्री उशिरा संपली. कारवाई हो विरोधकांचं षडयंत्र होतं असं पाटील यांनी म्हटलंय. त्यानंतर आज पंढरपुरात असलेल्या प्रवीण दरेकर यांनी अभिजीत पाटील यांची भेट घेतली.