Abhijit Panse MNS : कोकणातून अभिजीन पानसे मनसेकडून पदवीधरसाठी मैदानात

Continues below advertisement

Abhijeet Panse MNS : कोकणातून अभिजीन पानसे मनसेकडून पदवीधरसाठी मैदानात

Vidhan Parishad Election 2024 : मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (Maharashtra Navnirman Sena) कोकण पदवीधरसाठी उमेदवार रिंगणात उतरवला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 

मनसेनं केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे."

अभिजीत पानसेंना कोकण पदवीधरसाठी उमेदवारी जाहीर, पण मनसेची की, महायुतीची? 

कोकण पदवीधरमधून मनसेने अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केली. मात्र आता पानसेंची उमेदवारी ही मनसेची की महायुतीची असा सवाल उपस्थित झाला आहे. कोकण पदवीधरमधून डावखरे हे भाजपचे आमदार आहेत. त्यांचा कार्यकाळ संपतोय, त्याच जागेवर मनसेने उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे आता ही उमेदवारी मनसेची की महायुतीची असा सवाल उपस्थित झालाय. कोकण पदवीधरसाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार आहे. तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram