Abhijat Marathi: संगीताला भाषा नसते- नागराज मंजुळे ABP Majha
आज चांद्यापासून बांद्यापर्यंत आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतोय.. त्याच निमित्तानं एबीपी माझानं अभिजात मराठी या विशेष मोहिमेचं आणि कार्यक्रमाचं आयोजन केलंय... साहित्य हा कोणत्याही भाषेचा आत्मा असतो.... जेवढं साहित्य प्रगल्भ तेवढी भाषा समृद्ध हे समीकरण अधोरेखित करण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञाची गरज नाही.. मात्र गेल्या काही दशकांत मराठी साहित्याचा प्रवास कसा राहिला आहे... व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटरच्या युगात मराठी साहित्याची वाटचाल योग्य दिशेनं सुरु आहे की नाही?