Abdul Sattar Sillod : जरआरोप सिद्ध झाले तर सत्तार अब्दुल यांची आमदारकी जाणार
Continues below advertisement
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणींमध्ये वाढ झालीये. निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.. सिल्लोड न्यायालयाच्या तपासातून ही माहिती समोर आलीये.. मंत्री अब्दुल सत्तार यांनी 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत खोटी माहिती दिल्याचं उघड झालंय. या प्रकरणी सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी 2021मध्ये याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास केला. तेव्हा ही माहिती समोर आली. दरम्यान सिल्लोडच्या न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे आदेश बुधवारी दिले. हे आरोप सिद्ध झाल्यास सत्तार यांची आमदारकी जाईल. शिवाय ६ वर्षे निवडणूक लढण्यास अपात्र ठरतील.
Continues below advertisement