Abdul Sattar यांच्या अनेक संस्था फसवणूक करणाऱ्या शाळांच्या यादीत? अडचणी वाढण्याची शक्यता ABP Majha

Continues below advertisement

Abdul Sattar यांच्या अनेक संस्था फसवणूक करणाऱ्या शाळांच्या यादीत? अडचणी वाढण्याची शक्यता ABP Majha

शासनाची दिशाभूल करून शिष्यवृत्ती मिळविलेल्या शाळांच्या यादीमध्ये अब्दुल सत्तार यांच्या शाळांची नावे समाविष्ट. जिल्हा शिक्षण विभागाने औरंगाबाद जिल्ह्यातील काही शाळांना नोटीस दिली आहे. त्यानुसार शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने काही शाळांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली असून, ती तात्काळ वसूल करून शासन खाती जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
या यादीमध्ये कॅबिनेट कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कित्येक शैक्षणिक संस्था शाळांची नावे समाविष्ट असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी केला आहे. सर्वात जास्त विद्यार्थी म्हणजेच तब्बल 253 विद्यार्थ्यांकडून घेतलेली शिष्यवृत्तीची रक्कम वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram