Healthcare Shift: शिंदेंच्या ठाण्यात 'आपला दवाखाना' बंद, आता 'आरोग्य मंदिरा'तून मिळणार आरोग्यसेवा!

Continues below advertisement
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या 'आपला दवाखाना' योजनेला त्यांच्याच ठाणे बालेकिल्ल्यात घरघर लागली आहे. अनेक ठिकाणी ही योजना बंद पडल्याने, ठाणे महापालिकेने आता 'आरोग्य मंदिर' योजना राबविण्यावर भर दिला आहे. आरोग्य मंदिरमधील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, 'आमच्याकडे पर डे एटलीस्ट फोर्टी पेशंट्स असतात आणि अॅक्च्युअली हा दवाखाना त्यांना खूप सोयीचा पडतो.' गेल्या महिनाभरात ठाण्यात तब्बल 48 आरोग्य मंदिरे उभारण्यात आली असून, या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून विविध आरोग्य योजना राबवण्यात येणार आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांना त्यांच्या घराजवळ आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार आहे. 'आपला दवाखाना' बंद झाल्याने कर्मचाऱ्यांचे पगार थकले होते, जे आता पालिकेकडून दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola