Aanand Paranjape on Jitendra Awhad: आव्हाडांच्या भावनिक आवाहनाला आनंद परांजपेंचं सडेतोड उत्तर
Continues below advertisement
Aanand Paranjape on Jitendra Awhad: आव्हाडांच्या भावनिक आवाहनाला आनंद परांजपेंचं सडेतोड उत्तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला भावनिक आवाहन केलंय. तुम्ही सगळे परत या, मी आणि जयंत पाटील पक्ष सोडून जातो, असं भावनिक विधान आव्हाडांनी केलंय. आम्ही जर विठ्ठलाभोवतीचे बडवे असू तर आम्हाला यापुढे काहीही नको, मी दूर कुठेतरी निघून जातो, असंही ते पुढे म्हणाले. दरम्यान, आव्हाडांच्या या वक्तव्यावर त्यांचे माजी सहकारी आनंद परांजपे यांनी सडेतोड उत्तर दिलंय. तुम्ही जर आधीच नीट वागला असता, तर ही वेळ आलीच नसती, असं परांजपे म्हणाले.
Continues below advertisement