Aamchya Pappani Gampati Song : 'पप्पांनी गंपती आणला' गाण्याची धून तयार करणाऱ्याची गाथा

'आमच्या पप्पांनी गंपती आणला.. 'या गाण्याचे बोल आणि त्यात दिसणारा गोडुला साईराज सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. मात्र ज्या गोड शब्दांनी हे गाणं सोशल मीडियातून घराघरात पोहोचलंय. ते शब्द ज्यांच्या लेखणीतून साकारलेत ते मनोज घोरपडे, यांची कहाणी आता एबीपी माझा तुमच्या समोर आणतोय. गीतकर मनोज घोरपडे हे भिवंडी शहरालगतच्या राहनाळ  ग्रामपंचायतीमधील चरणी पाडा अंजूर फाटा येथे वडिलांच्या वडापावच्या गाडीवर वडे तळण्याचा व्यवसाय करतायत. पाच वर्षांपूर्वी त्यांनी हे गाणं लिहिले होते, तर त्यांची मुलं माऊली आणि शौर्य या दोघांनीही ते गायलेलं. तेव्हा ते तितकं लोकप्रिय झालं नाही, ते साईराजच्या व्हिडीओतून झालंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola