Aamane Samane Mansoon Session : पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP Majha
Aamane Samane Mansoon Session : पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP Majha
राज्यात विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात राज्यातील अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु आहे. तर महायुती सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पावरही विरोधकांनी टीका केलीय. पाहुयात सर्व विषयांवर आमचा विशेष कार्यक्रम आमनेसामने,
ही बातमी पण वाचा
पुणे : वर्षा पर्यटनासाठी लोणावळ्याला भुशी डॅमला (Lonavala Bhushi Dam) गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू झालाय तर एकाचा शोध सुरू आहे. ही घटना ताजी असताना पुण्यातील ताम्हिणी घाटातील एक दुर्घटना समोर आली आहे. ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक तरुण वाहून गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. हा तरुण आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता. स्वप्नील धावडे असं या तरुणाचं नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील धावडे हा तरुण आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता. शनिवारी गा ग्रुप ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे गेला होता. स्वप्नील हा पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथील रहिवाशी आहे. ताम्हिणी घाटात गेलेल्या स्वप्नील धावडेने पाण्यात उडी मारल्यानंतर तो जोरदार प्रवाहात बेपत्ता झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तो उंचावरून धबधब्यात उडी मारताना दिसत आहे.
दोन दिवसांनी मृतदेह सापडला
सतत पडणाऱ्या पावसामुळे ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीच्या कुंडांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला आहे. पौड पोलिस, ताम्हिणी वनविभाग, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती, शिवदुर्ग टीम लोणावळाने प्लस व्हॅलीच्या वरील बाजूच्या पाण्याच्या दोन्ही कुंडांमध्ये आणि आसपासच्या परिसरात स्वप्नीलचा शोध घेतला. मात्र, या टीमला कोठेही स्वप्नील आढळला नाही. दरम्यान, रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी सहापर्यंत या परिसरात शोधकार्य सुरू होते. आजही सकाळी पुन्हा या ठिकाणी शोधकार्य सुरू होते. आज मृतदेह रायगड जिल्ह्यातील मानगाव येथे आढळून आला.