AAP in Mumbai : गुजरात निवडुकांनंतर 'आप'ला नवं बळ, महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढवणार
गुजरात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आकडेवारीनं आम आदमी पार्टीच्या नेत्यांचा आत्मविश्वास आणखी उंचावला आहे. नजिकच्या काळात महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा 'आप'चा इरादा असून, त्यात मुंबई महापालिकेचाही समावेश आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला अंदाजे १३ टक्के मतं मिळाली. आणि त्याच निकषावर 'आप'ला देशातल्या नवव्या क्रमांकाचा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये 'आप'ची सत्ता आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत 'आप'नं भाजपची गेल्या १५ वर्षांची सत्ता उलथवून पूर्ण बहुमत मिळवलं आहे. या यशानं 'आप'च्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळं पुढच्या काळात मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 'आप'कडून लढवण्यात येतील. आता मुंबईकरही आपल्याला मुंबईत अरविंद केजरीवाल हवे आहेत असं म्हणतायत, याकडे प्रीती मेनन यांनी लक्ष वेधलं.