Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे नागपूर दौऱ्यावर, बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाणार? ABP Majha
abp majha web team
Updated at:
22 May 2023 10:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआदित्य ठाकरे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. अजनी परिसरातील प्रस्तावित इंटर मॉडेल रेल्वे स्टेशनसाठी तोडाव्या लागणाऱ्या झाडांच्या संदर्भात जे पर्यावरणवादी लढा देत आहे. त्यांची हॉटेलमध्ये भेट घेणार आहेत. त्यानंतर आदित्य ठाकरे पारशिवनी तालुक्यातील वराडा गावात जाणार असून त्या ठिकाणी एका खाजगी कोल वॉशरीमुळे परिसरात झालेला प्रदूषण आणि त्यामुळे झालेली शेतीची हानीची पाहणी करत गावकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. कोराडी औष्णिक वीज केंद्रासाठी महानिर्मितीने निश्चित केलेल्या नांदगाव येथील राखेच्या तलावाच्या जागेवर जाणार आहेत. पर्यावरणवादी आणि स्थानिक ग्रामीण आणि नांदगाव परिसरात औष्णिक वीज केंद्रच्या प्रस्तावित राखेच्या तलावाला विरोध केला आहे, दुपारी 2.30 वाजता आदित्य ठाकरे नागपूरात येणार आहेत.