Aaditya Thackeray:विजयी घोषित करुनही किर्तीकर हरले कसे? ठाकरे गटाने 19 ते 23 व्या फेरीचं गणित मांडलं

Continues below advertisement

अनिल परब म्हणाले,  4  जूनला निकाल लागला यामध्ये अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला. हा सर्व संशयास्पद निकाल आहे.  19 व्या फेरीनंतर निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे डावलण्यात आली.  प्रत्येक फेरीनंतर कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली याची आकडेवारी दिली जाते. प्रत्येक राउंडनंतर 19 व्या फेरीपर्यंत हे सगळं व्यवस्थित सुरु होतं. पक्षाचे प्रतिनिधी आकडेवारीची टॅली करतात. मग RO आकडेवारी फायनल करतात. RO आणि उमेदवारचा प्रतिनिधी यामध्ये अधिक अंतर होतं. मतं मोजून झाल्यानंतर फॉर्म 17C भरून द्यायचा असतो. ज्यामध्ये आपल्या उमेदवाराला किती मतं मिळाली हे द्यावं लागतं. पण फॉर्म अनेकांना दिले नाहीत. आमच्या टॅलीमध्ये 650 पेक्षा अधिक मिळाले आहेत. 650 मतांचा फरक आमच्या आणि त्यांच्या टॅलीमध्ये येतोय. निकाल जाहीर करण्याआधी निवडणूक अधिकारी सांगतात की, आम्ही निकाल जाहीर करतोय. मात्र यामध्ये काहीच सांगण्यात आलं नाही

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola