अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या यूजीसीच्या निर्णयाविरोधात आदित्य ठाकरे सुप्रीम कोर्टात!

कोरोनाचं संकट असतानाही अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या यूजीसीच्या (विद्यापीठ अनुदान आयोग) निर्णयाविरोधात युवासेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. युवासेनेने यूजीसीच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल केली आहे. कोविडच्या पार्श्वभूमी त्या त्या राज्याच्या परिस्थितीनुसार प्रत्येक राज्यातील विद्यापीठांना संबंधित अंतिम वर्षांच्या परीक्षांचा निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात यावा, जेणेकरुन विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. तसंच देशात सर्व विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कांसाठी आम्ही खंबीरपणे उभी राहणार असल्याचं युवानेनेने म्हटलं आहे. युवासेनेने याआधी या निर्णयाचा विरोध केला होता

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola