Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

Continues below advertisement

Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

राज्यात गेल्या काही दिवसांत बड्या नेत्यांच्या घरी लग्नांचा सिझन पाहायला मिळत असून शाही विवाह सोहळ्याच्या निमित्ताने राजकीय नेते, कुटुंब एकत्र येत आहेत. 
अभिनेता आदेश बांदेकर यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यानंतर आयोजित रिसेप्शन सोहळ्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती होती.
आता, मनसे नेते अमित ठाकरे यांचे मेहुणे डॉ.राहुल बोरुडे यांच्या विवाहाचा स्वागत समारंभ मुंबईतील वेलिंग्टन क्लब येथे पार पडत आहे. या स्वागत समारंभासाठी ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
दिल्लीमध्ये डॉ.राहुल बोरुडे यांचे लग्न पार पडले होते, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आवर्जुन उपस्थित होते. विशेष म्हणजे तेव्हा मोदींनी राज ठाकरेंच्या नातवाला जवळ घेत गालगुच्चे घेतले होते.
मुंबईती आज या लग्नसोहळ्याच्या स्वागत समारंभासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहिले आहेते. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यावेळी मस्त गप्पा मारताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
आदित्य ठाकरे आमि अमित ठाकरे यांच्याही या लग्नसोहळ्यात गप्पा मारताना आणि एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसून आले.
आदित्य ठाकरे या लग्नसोहळ्यातील स्वागत समारंभात हसत खेळत दिसून आले. काका राज ठाकरेंना जादू की झप्पी तर पुतण्यासोबत खेळताना दिसून आले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola