Aaditya Thackeray - Devendra Fadnavis : मुद्दा एआयचा; राज्यात कायदा, आदित्य ठाकरेंचा सवाल !
Continues below advertisement
Aaditya Thackeray - Devendra Fadnavis : मुद्दा एआयचा; राज्यात कायदा, आदित्य ठाकरेंचा सवाल ! आर्टिफिशियल इंटिलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धीमत्तेवर आज विधिमंड़ळात चर्चा झाली. युरोपिअन महासंघाचप्रमाणं आपणही कुठला कायदा करणार आहोत का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. अभिनेत्री रश्मिका मंधनाचा एक डीपफेक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर अनेकांचे डीपफेक व्हिडीओ व्हायरल होऊ लागले. याबाबत विद्यमान आयटी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल होतात. मात्र कृत्रिम बुद्धीमत्तेबाबत स्वतंत्र कायदा अजून करण्यात आलेला नाहीये.
Continues below advertisement