Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
युवा सेनाप्रमुख आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दादरच्या हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, सचिन अहिर यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. दादरच्या हनुमान मंदिराला रेल्वेने नोटीस दिली होती. या मुद्यावरुन चांगलच राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. याच मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका देखील केली होती. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या आज दर्शनासाठी आले होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली होती.
दादर रेल्वे स्टेशनजवळच्या हनुमान मंदिराला रेल्वेने नोटीस दिली होती. शुक्रवारी उद्धव ठाकरेंनी या मुद्द्यावरुन महायुती सरकारवर टीका केली. भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उभं करत भाजपला आरोपीच्या उभा करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी आज त्या मंदिरात जाऊन आरती केली यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते.