Aaditya Thackceray On Amit Thackeray धाकटे बंधू अमित ठाकरेंच्या उमेदवारीवरुन आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Continues below advertisement

Aaditya Thackceray On Amit Thackeray धाकटे बंधू अमित ठाकरेंच्या उमेदवारीवरुन आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
माहीम विधानसभेतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे याचा उद्या होणार पहिला मेळावा  दादर येथे होणाऱ्या या मेळाव्यासाठी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने राहणार उपस्थित उद्या सायंकाळी ७ वा. मेळावा.  उद्याच्या मेळाव्यातून अमित ठाकरे फुंकणार प्रचाराचे रणशिंग  माहीम मध्ये तिरंगी लढत होणार आहे  मनसेकडून अमित ठाकरे, शिंदे यांच्या सेनेकडून सदा सरवणकर तर शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत आहेत रिंगणात.  उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काल माहीममधील अनेक मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील अमित ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. आता माजी मंत्री आणि वरळीतील ठाकरे गटाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी देखील अमित ठाकरेंना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तुमचे दोन भाऊ अमित ठाकरे आणि वरुण सरदेसाई देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना काय सांगाल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत. मी सर्वांना शुभेच्छा देतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram