Raigad Marathi Family Issue : रायगडमध्ये मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून अपमानास्पद वागणूक
Raigad Marathi Family Issue : रायगडमध्ये मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून अपमानास्पद वागणूक
मराठी माणसाला पुन्हा परप्रांतीय नागरिकांकडून त्रास रूम एग्रीमेंट संपल्यामुळे मराठी माणसाला परप्रांतीयांकडून अपमानास्पद वागणूक जिल्हाध्यक्षा आदिती सोनार यांची मनसेच्या कार्यकर्त्यांसह मराठी माणसाच्या न्यायासाठी धाव महाराष्ट्रात राहून मराठी माणसाच्या नादाला लागलात तर पळून पळून मारू - आदिती सोनार Anchor - रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यातील भोकरपाडा भागातील एका मराठी कुटुंबाला परप्रांतीय कुटुंबाकडून सातत्याने त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भाडेकरू मराठी कुटुंबाचे येथील सोसायटी मधील रहाण्याचे कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर घरमालकाने त्यांच्याकडील छोटं मुल असल्यामुळे त्यांना राहण्याची आणखी मुभा दिली होती. मात्र सोसायटीतील परप्रांतीय चेअरमन महिलेकडून रूम सोडण्यासाठी या कुटुंबावर सातत्याने दबाव टाकण्यात आला. शिवाय या कुटुंबाशी भांडण करून मराठी माणसाची इथे राहण्याची लायकी नाही अशा स्वरूपातील वाद घालत त्यांना शिवीगाळ करण्यात आल्याचं गायकवाड कुटुंबाचे म्हणणं आहे. या घटनेनंतर मनसेने या प्रकरणात उडी मारली आहे. शिवाय घडलेल्या घटनेचा परप्रांतीय कुटुंबाला जाब विचारला यासंदर्भात मराठी कुटुंबाची माफी मागण्यास या परप्रांतीय महिलेला भाग पाडलं. पुन्हा मराठी माणसाच्या वाटेला गेला तर पळून पळून मारू असा सल्लड दम मनसेच्या रायगड जिल्ह्याध्यक्षा आदिती सोनार यांनी दिला.