Aadesh Bandekar on EVM Issue : EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड, आदेश बांदेकर म्हणतात, स्ट्रॅटेजी...

Continues below advertisement

मुंबई :  पवई हिरानंदानी भागात अजूनही राडा सुरूच आहे. पवई हिरानंदानी भागात दोन तासांपासून मतदान खोळंबलं होतं. बंद पडलेलं मतदान यंत्र बदलूनही मतदान खोळंबलेलंच आहे. त्यातच शिंदे गटाचे नेते दिलीप लांडे (Dilip Lamde)  यांना आत सोडल्याने गोंधल अजून वाढला. ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar)  यांनी संताप व्यक्त केला आहे. मतदान बंद असतानाच लांडेंना आत सोडलंच कसं असा सवाल विचारण्यात येतोय.

  पवईत ईव्हीएम मशीन बंद असल्याची तक्रार  अभिनेता आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकरांनी दुपारी 12 च्या सुमारास केली आहे.  त्यानंतर जवळपास तासाभरानं इव्हीएम रिप्लेस केल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली. मात्र त्यानंतर एक तास उलटून गेलाय पण अजूनही त्यांचं मतदान झालं नाही.  अभिनेता आदेश बांदेकर, त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर, अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासह  100 च्या आसपास लोक मतदानासाठी ताटकळले आहेत .

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram