Aaba Bagul Diwali : पुण्यात रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या मुलांना अभ्यंग स्नान

Continues below advertisement

Aaba Bagul Diwali : पुण्यात रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या मुलांना अभ्यंग स्नान

फटाक्यांची आतषबाजी, फराळाची लगबग, कपड्यांची खरेदी अशा थाटात सधन कुटुंबांमध्ये दिवाळी साजरी होत असली तरी अनेक गरजू, गरीब मुलं मात्र हे सण साजरा करण्यापासून वंचितच राहतात. या मुलांनाही दिवाळी थाटात साजरा करण्याचा अधिकार असून त्यांना तो मिळवून देण्यासाठी पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आबा बागुल यांनी पुढाकार घेतलाय.

आज नरक चतुर्दशीच्या दिवशी विशेष स्नानाची परंपरा आहे, त्याला 'अभ्यंग स्नान' म्हणतात. प्रचलित प्रथेनुसार नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नानासाठी तिळाचे तेल वापरले जाते.  उटणे आणि तेल लावून केले जाते. पुण्यात एक स्तुत्य उपक्रम म्हणून काँग्रेस चे बंडखोर नेते आणि पर्वती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आबा बागुल यांनी आज रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या मुलांना अभ्यंग स्नान घातले. ज्या मुलांना खरं तर दिवाळी साजरी करता येत नाही, अभ्यंग स्नानाचा आनंद घेता येत नाही म्हणून हा उपक्रम दरवर्षी राबवण्यात येतो.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram