Ashish Shelar : 12 आमदारांच्या निलंबनाबाबत विधीमंडळीकडे शिक्षा कमी करण्यासाठी याचिका दाखल करणार

Continues below advertisement

Maharashtra 12  MLAs Suspension : महाराष्ट्रातील भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नकार दिला आहे. याप्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज कोणताही स्पष्ट निर्णय दिला नाही. आता याप्रकरणाची पुढची सुनावणी 11 जानेवारीला होणार आहे. आजच्या सुनावणीनंतर राज्य सरकारला नोटीस देण्यात आली आहे, मात्र तूर्तास कुठलाही आदेश दिलेला नाही .  

जुलै महिन्यात झालेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणासंदर्भातील ठरावावरुन मोठा गोंधळ झाला होता. त्यावेळी तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन केलं होतं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन झाल्याने राज्यात मोठं राजकारण रंगलं. निलंबित आमदारांमध्ये  संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, पराग अळवणी, राम सातपुते यांच्यासह 12 जणांचा समावेश आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram