Be Positive | आटपाडीतील उच्चशिक्षित तरुणाने तळ्याच्या मध्यभागी उभारला तरंगता मत्स्य संवर्धन प्रकल्प
Continues below advertisement
सांगली जिल्ह्यातील आटपाडी मधील संकेत शिवाजीराव मोरे या मेकॅनिकल पदवीधर तरुणाने नोकरीच्या मागे न लागता केज कल्चर मत्स्य शेती सुरू केलीय. म्हणजे तलावाच्या मध्यभागी पिंजरा पध्दतीने मत्स्य संवर्धन प्रकल्प उभारलाय. विशेष म्हणजे तलावात हा पूर्ण प्रकल्प तरंगता आहे. 200 भर प्लास्टिक बॅरलचा वापर करून आटपाडी तालुक्यातील कामथ गावाजवळच्या डोंगरात असलेल्या तलावात हा तरंगता प्रोजेक्ट उभारण्यात आलाय. एकूण 75 लाखाचा असलेला हा प्रकल्प मागील 4 वर्षांपूर्वी उभारण्यात आला असून यात आता त्याचा चांगला जम बसलाय. तीलापिया आणि पंगेसियस दोन जातीचे एकूण 24 पिंजऱ्यात उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र राज्य मत्स्य उद्योग विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या पंतप्रधान मत्स्य संपदा योजना मध्ये हा प्रकल्प उभारला गेलाय.
Continues below advertisement