Salman Khan : काही दिवसांपूर्वी सलमानला आलेलं धमकीचं पत्र, सलमान खान मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला

Continues below advertisement

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खाननं मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन आपल्या सुरक्षाव्यवस्थेबाबत चर्चा केली. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना काही दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीनंतर सलमाननं स्वत:च्या संरक्षणासाठी शस्त्र परवान्याचा अर्जही दाखल केला होता. त्याच पार्श्वभूमीवर त्यानं आज पोलीस आयुक्त फणसळकरांची भेट घेतली. मुंबई पोलिसांच्या गुप्तचर विभागानं दिलेल्या अहवालात काय म्हटलं आहे, याची फणसळकरांनी सलमानला माहिती दिली. त्यानंतर सलमाननं सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचीही भेट घेतली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram