SSC Result 2020 | दहावीचा गेल्या 15 वर्षांतील सर्वाधिक निकाल
अनेक दिवसांपासून दहावीचे विद्यार्थी ज्या निकालाची वाट पाहत होते, तो निकाल आज जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. यामध्ये 96.91 टक्के मुली पास झाल्यात तर 93.90 टक्के मुलं पास झाली आहेत. राज्यात एकूण 242 असे विद्यार्थी आहेत, की ज्यांनी या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवले आहेत.