9 Seconds Superfast News : 9 सेकंदात सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 09 October 2024

Continues below advertisement

9 Seconds Superfast News : 9 सेकंदात सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 09 October 2024
मविआचं २४० ते २५० जागांवर ठरलं,  ४० ते ५० जागांवर अजूनही चर्चा सुरू, ठाकरे गट १०० च्या आसपास जागा लढणार, तर काँग्रेस १०० हून अधिक जागा लढण्याची शक्यता. 
 आज महाविकास आघाडीची सलग तिसऱ्या दिवशी बैठक . विदर्भातल्या तिढा असलेल्या जागांवर आज चर्चा, काही जागांचा तिढा कायम राहिल्यास पक्षप्रमुख सोडवणार
आपली राजकीय भूमिका कोणाला दुखवायची नव्हती, जो निर्णय घेतला तो पवार साहेबांना विचारुन आणि संमतीनेच, बारामतीतल्या डॉक्टर मेळाव्यात अजित पवारांचं वक्तव्य. 
सुप्रिया सुळेंविरोधात घरातील उमेदवार देणं ही चूक मी आधी मान्य केली होती आणि आताही मान्य करतो, अजित पवारांचा पुनरूच्चार. 
एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब. 
अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढवणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांची घोषणा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram