9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 18 Aug 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 18 Aug 2024 : ABP Majha
पुण्याच्या कात्रज, शिवाजी नगर, सिंहगड रोड परिसरात मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचायला सुरुवात.
पुण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नागझरी ओढ्याला पूर, टिंबर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात शिरलं पाणी, अनेक दुकानांमध्ये पाणी गेल्याने लोकांचं नुकसान.
पुण्याच्या रामवाडी भागातील भुयारी मार्गात पाणी साचल्यानं वाहनं खोळंबली, भुयारी मार्गातून पाणी वाहून जाण्याची कोणतीही सोय केली नसल्याचा स्थानिकांचा आरोप.
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर नाशिकच्या येवल्यात पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला, मका, बाजरी, भुईमूगसह खरिप पिकांना मिळणार संजीवनी.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये विजांच्या कडकडाटांसह पावसाची हजेरी, ब्रह्मगिरी प्रदक्षिणासाठी आलेल्या भाविकांची मोठी तारांबळ.
बीडच्या माजलगावात जोरदार पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा, पावसामुळे सोयाबीन आणि कापूस पिकांना मोठा फायदा होणार.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचं दमदार कमबॅक, जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पावसाच्या सरी, पुढील तीन दिवस जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट.