9 Sec News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर एबीपी माझा

Continues below advertisement

चांदीवाल समितीसमोर जबाब देताना देशमुखांकडून दबाव, फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात वाझेंचा आरोप, पत्राची कॉपी माझाच्या हाती
अवैध हुक्का पार्लर प्रकरणात आरोपीला सोडण्यासाठी जयंत पाटलांचा दबाव, वाझेंच्या पत्रात उल्लेख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा
राज ठाकरे मुक्कामी असलेल्या धाराशीवमधल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांची निदर्शनं, खोलीत येऊन चर्चा करण्याची सूचना आंदोलकांना अमान्य, राज उद्धटपणे बोलल्याचा आरोप 
मुस्लिम मतांमुळे उद्धव ठाकरेंचा लोकसभेत स्ट्राईक रेट, शिंदेंच्या सेनेवर शिक्कामोर्तब करताना आंबेडकरांचं वक्तव्य, तर परप्रांतियांबाबतच्या वक्तव्याप्रकरणी राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी
बांगलादेशमध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांसाठीच्या आरक्षणाचा मुद्दा पेटला, राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना भारतात
४८ तासांत काळजीवाहू सरकार स्थापन करू, बांगलादेशच्या लष्करप्रमुखांचं जनतेला शांततेचं आवाहन, मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण
भारत-बांगलादेश ट्रेन रद्द, सीमेवर गस्त वाढवण्याचा निर्णय, सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क राहण्याचा आंतरराष्ट्रीय अभ्यासकांचा सल्ला
स्वबळाचा नारा देणाऱ्या मनसेकडून विधानसभेसाठी दोन उमेदवार जाहीर, शिवडीतून नांदगावकर तर पंढरपुरातून दिलीप धोत्रेंना संधी

आरोप मागे घेण्यासाठी सलील देशमुख पाया पडायला तयार होते, परमबीर सिंह यांची माझाला प्रतिक्रिया, तर आमच्याबरोबर फडणवीसांचीही नार्को टेस्ट करा, सलील देशमुखांचा पलटवार
वरुण सरदेसाईंची थेट काँग्रेसच्या बैठकीला उपस्थिती, झिशान सिद्दींकडून आक्षेप, तर नाना पटोलेंकडून सिद्दीकींना क्रॉस वोटिंगची आठवण
कागलमध्ये हसन मुश्रीफांविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं समरजीत घाटगेंना गळ घातल्याची चर्चा, विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या घाटगेंकडून सस्पेन्स कायम
पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात, एकता नगर आणि सांगवीतील पूरग्रस्तांशी संवाद
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची आज कांस्य पदकासाठी लढत, मलेशियाच्या ली झी जियाशी होणार सामना 
राज ठाकरेंचं देवदर्शन, अक्कलकोटमधील स्वामी समर्थ आणि तुळजाभवानीचं घेतलं दर्शन.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram