9 Sec News | राज्यातील बातम्यांचा 9 सेकंदात आढावा सुपरफास्ट ABP Majha

Continues below advertisement

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा निवासस्थानी भेट, जागावाटप आणि इतर विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता.  

गौतम अदानी-मुख्यमंत्री शिंदेंमध्ये बैठक

सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी तीन वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार, बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. 

अजित पवार गटाच्या मावळच्या जागेवर भाजपचा दावा, मावळ विधानसभेचा पुढचा आमदार कमळाच्या चिन्हावर निवडून येईल, भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंचा दावा, 2 ऑगस्टला मावळात मेळाव्याचे आयोजन. 

अजित पवार गटाच्या मावळ विधानसभेवरून महायुतीत चांगलाच तिढा निर्माण, मावळमध्ये भाजपने धरलेला आग्रह योग्य नाही, भाजपच्या दाव्यावर सुनील शेळकेंकडून नाराजी व्यक्त.  

स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टींनी घेतली मनोज जरांगेंची भेट, दीड तास दोघांमध्ये चर्चा, चळवळीतली माणसं एकत्र आल्यावर केवळ तब्येतीची चर्चा होते असं नाही, राजू शेट्टींची भेटीनंतर प्रतिक्रिया.  

आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. पूरग्रस्त भागाची पाहणी करणार, तर पुणे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचा नेमका काय परिणाम झाला याची माहिती घेणार. 

प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा आज बीड जिल्ह्यात दाखल होणार, अंबाजोगाई, केज, कपिलधारमधून ही यात्रा चौंडी इथं जाणार.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram