9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 PM : 28 July 2024 : ABP MAJHA

Continues below advertisement

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 PM : 28 July 2024 : ABP MAJHA 

हेही वाचा : 

महायुतीमध्ये (Mahayuti) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सहभागी होण्यापूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्लीमध्ये (Delhi) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत कशा बैठका केल्या, याबाबत भाष्य केले. मास्क आणि टोपी घालून दिल्ली दौरा करत होतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. यावरून आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.   दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये सहभागी होण्यापूर्वी मी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये 10 बैठका झाल्या होत्या. या बैठकीला जाण्यासाठी मी खास पेहराव करून दिल्लीला जायचो. मास्क आणि टोपी घालून मी या बैठकीला उपस्थिती लावायचो, असे वक्तव्य त्यांनी केले. अजित पवारांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.   स्वाभिमानी जनतेने त्यांच्या पार्टीला टोपी घातली यावरून रोहित पवार म्हणाले की, अजित पवार हे धडाडीचे दादा म्हणून आम्हाला माहीत होते. आत्ताचे भाजपसोबत गेलेले अजित दादा यांना सर्व गोष्टी विचाराव्या लागतात. एखादी सही केल्यानंतर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याकडे त्यांची फाईल जाते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे फाईल जाते. दादांनी टोपी तुम्ही घातली असावी. पण, आपण लोकसभेमध्ये बघितलं तर स्वाभिमानी जनतेने त्यांच्या पार्टीला टोपी घातली आहे, असा टोला रोहित पवारांनी अजित पवारांना लगावला आहे.   बारामतीत लढत होईल, असा उमेदवार देणार बारामतीत विधानसभा निवडणुकीसाठी कुठला उमेदवार देणार अशी विचारणा केली असता रोहित पवार म्हणाले की, बारामतीत योग्य असा उमेदवार देऊ, राजनीतीचा तो भाग आहे. पुढील वीस दिवसात समजेल की तिथे उमेदवार कोण असेल, उमेदवार जो कोणी असेल, योग्य उमेदवार तिथे दिला होता. तिथे खूप चांगली लढत आमच्याकडून होईल, असे त्यांनी म्हटले.   रोहित पवारांचा मिसळीवर ताव  रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये मिसळचा आस्वाद घेतला. यावेळी ते म्हणाले की, मिसळ ही आपल्या महाराष्ट्राचे डिश आहे. सामान्य लोकांचे प्रतीक आहे. जेव्हा पण मी एखाद्या बैठकीला जातो, त्यावेळेस कार्यकर्त्यांसोबत प्रसिद्ध हॉटेलवर जाऊन मला खायला आवडतं. रामकृष्ण हरी, मिसळ आमची भारी असं म्हणण्याची वेळ आज आहे, असे त्यांनी म्हटले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram