9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 PM : 22 July 2024 : ABP MAJHA
9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 PM : 22 July 2024 : ABP MAJHA
आरक्षण प्रश्नी पवारांशी चर्चेनंतर मुख्यमंत्री शिंदे फडणवीसांची तासभर खलबतं, तर जरांगे आणि हाकेंना काय शब्द दिलाय? पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक, बावनकुळे, पंकजा मुंडे, शेलार, दानवेंसह प्रमुख नेते हजर, तर उद्या संघासोबत खलबतं
पुढचे मुख्यमंत्री शिंदेच होणार, फडणवीसांच्या वक्तव्याची खासदार नरेश म्हस्केकडून आठवण, तर दरेकरांकडून सबुरीचा सल्ला, युतीतल्या खडाजंगीची जोरदार चर्चा
विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांचं निलंबन होणार नसल्याची माहिती, मात्र विधानसभेत तिकीट कापलं जाण्याची शक्यता
स्वतंत्र विधानसभा लढण्याबाबत राज ठाकरेंकडून आढावा, नेमलेल्या निरीक्षकांसोबत खलबतं
मनोज जरांगेंसाठी लाडका आंदोलक योजना जाहीर करा, लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंवर टीका.. तर खिरापत वाटल्यासारखे कुणबी
प्रमाणपत्र वाटले जातात, सरकारवर आरोप
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर..कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळी वाढ, एनडीआरएफ दाखल, तर पंचगंगेनंही ओलांडली इशारा पातळी,
मुंबई-पुणे-कोकणावर आभाळाची माया, धरणं भरली, पण मराठवाड्याकडं पावसाची पाठ, अजूनही टँकरवरच मदार
जुनी पेन्शन लागू करण्याचा कोणताही विचार नाही, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंच्या प्रश्नावर केंद्र सरकारचं उत्तर,
विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीचा गर्भपातादरम्यान मृत्यू..मावळमधल्या घटनेनं खळबळं मृतदेहाची विल्हेवाट लावताना दोन मुलांनाही फेकलं नदीत