9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 23 ऑक्टोबर 2024 : ABP MAJHA

Continues below advertisement

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 23  ऑक्टोबर 2024 : ABP MAJHA 

राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) आपल्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. भाजपाने आतापर्यंत आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेनेही 22 ऑक्टोबर रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी सार्वजनिक केली आहे. या यादीत एकूण 45 उमेदवारांचा समावेश आहे. या पहिल्याच यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचादेखील समावेश आहे. दरम्यान, शिंदे यांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून मोठी रणनीती आखली जात आहे. शिंदे यांच्या पराभवासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या पुतण्याला तिकीट देण्याची शक्यता आहे.  उद्धव ठाकरे टाकणार मोठा डाव?  एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातून यावेळची विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. या मतदारसंघात शिंदे यांचे मोठे प्रस्थ आहे. याच जागेवरून त्यांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा पक्ष मोठी व्यूहरचना आखत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून केदार दिघे  यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. केदार दिघे हे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे असून ते शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख आहेत.  केदार दिघे यांना कोपरी पाचपाखाडी येथून तिकीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी या मतदारंसघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात केदार दिघे हे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे शिंदे विरुद्ध दिघे असा सामना कोपरी पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळू शकतो. केदार दिघे यांनी ठाणे शहर आणि कोपरी पाचपाखाडी या दोन्ही विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार ठाणे शहरातून माजी खासदार राजन विचारे यांच्या नावाचा विचार शिवसेना ठाकरे गटाकडून केला जात आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram