9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :2 डिसेंबर 2024: ABP MAJHA

Continues below advertisement

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :2 डिसेंबर 2024: ABP MAJHA 

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दरे गावातून ठाण्यात परतले आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेला विलंब झालेल्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंच्या दरे गावच्या दौऱ्यामुळे महायुतीची बैठक रखडली होती. ती देखील लवकरच होण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्रिपदापासून अनेक महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. दरम्यान, दरेगावातून ठाण्यात येताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. 

पत्रकार परषदेत तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी जनतेची इच्छा आहे, असं एकनाथ शिंदेंना विचारण्यात आलं. यावर मी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा सहाजीकच आहे. कारण मी जनतेच्या मनामध्ये राहून काम केलं. हे जनतेचे प्रेम आहे. मला दोन उपमुख्यमंत्र्यांनीही साथ दिली. सीएम म्हणजे कॉमन मॅन...समजून मी काम केलं आहे, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. गेल्या अडीच वर्षाची आमच्या विकास कामाची ही पोच पावती आहे. जे प्रकल्प मागील अडीच वर्षांपूर्वी थांबवले होते ते वेगाने सुरू केले आहेत. आतापर्यंतचा इतिहासामध्ये विविध योजना झाल्या त्यापेक्षा सर्वात जास्त योजना आम्ही राबवले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात या झालेल्या योजना सुवर्ण अक्षरात लिहिल्या जातील, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram