Cabinet Ministry NCP : अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांना तगडी खाती

Continues below advertisement

२ तारखेला अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. आणि आज १३ दिवसांनी ९ मंत्र्यांना खाती मिळाली... अर्थ खातं कुणाकडे जाणार यावरुन १३ दिवस राजकारण रंगलं होतं... पण शिंदे गटाच्या नाराजीनंतरही अर्थ खातं देवेंद्र फडणवीसांकडून अजित पवार यांच्याकडेच आलंय.... इतकंच नाही तर अजित पवारांच्या गटातील  ९ मंत्र्यांना शिवसेनेच्या ३ तर भाजपच्या ६ मंत्र्यांची खाती देण्यात आलीएत.. त्यामुळे अजित पवारांच्या मंत्र्यांना तगडी खाती मिळालीएत.. पण दुसरीकडे शिंदेंच्या गटातील ३ मंत्र्यांची खाती काढून त्यांना कमी महत्त्वाची खाती देण्यात आल्याची चर्चा रंगतेय... याउलट भाजपच्या ज्या मंत्र्यांची खाती अजित दादांच्या मंत्र्यांना देण्यात आलीए त्या मंत्र्यांना आधी पेक्षा चांगली खाती काहींना मिळालीएत... त्यामुळे एकंदर या खातेवाटपात सगळ्यांची मनं राखण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय... पण त्याचसोबत शिंदे गटाला कमी महत्त्वाची खाती दिल्यानं आता शिंदे गटाचा रोष वाढणार का हे पाहावं लागेलं

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram