Chandrapur : कॉंग्रेसचा शिवसेनेला जोरदार धक्का! वरोरा नगरपरिषदेतील सेनेचे 7 नगरसेवक कॉंग्रेसमध्ये
Continues below advertisement
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळत आहे. चंद्रपुराच्या वरोरा नगरपरिषदेतील शिवसेनेच्या 7 नगरसेवकांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ज्या शिवसेनेच्या सात नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय ते अनेक वर्षांपासून बाळू धानोरकर यांच्या सोबत आहेत. वरोरा न.प. ची मुदत संपत आली आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई नक्कीच होणार आहे आणि जास्तीत जास्त नगरसेवक आम्ही निवडून आणू आणि इथल्या खासदार आणि आमदारांना उत्तर देण्याचा प्रयत्न करू. महाविकास आघाडीच्या धर्माचं पालन होत नाही आहे, आमचे वरिष्ठ याला उत्तर देतील, असं पक्षाकडून सांगितलं गेलंय. मात्र भद्रावतीचे एकही नगरसेवक त्यांच्यासोबत गेले नाही ही पुढच्या निवडणुकीची नांदी आहे.
Continues below advertisement