Yavatmal Child Death: यवतमाळमध्ये 6 वर्षांच्या मुलाचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
Continues below advertisement
यवतमाळच्या पिंपळकुटी येथे एका सहा वर्षांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले असून, अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) तपासाला सुरुवात केली आहे. 'सर्दी खोकल्याचं औषध घेतल्यानंतर या मुलाची तब्येत बिघडली', असा दावा मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलावर सुरुवातीला एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र तिथे त्याची प्रकृती अधिकच खालावली. त्यानंतर त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) संबंधित औषधाचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या तपासणीच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement