Special Report Navi Mumbai Fire: गॅसमुळे आग, नवी मुंबईत अग्नितांडव, माय-लेकींचा मृत्यू
Continues below advertisement
दिवाळीच्या रात्री नवी मुंबईतील वाशी (Vashi) आणि कामोठे (Kamothe) परिसरात झालेल्या दोन भीषण अग्नितांडवांनी सहा जणांचा बळी घेतला आहे. या दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना मोकळ्या जागा, विशेषतः फायर स्पेसेस, पार्किंगसाठी न वापरण्याचे आवाहन केले आहे. 'हाऊसिंग सोसायटीने अंतर्गत जागा मोकळ्या ठेवल्या पाहिजेत कारण त्या फायर स्पेसेस आहेत. तिथे पार्किंग केल्यास कारवाई केली जाईल,' असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. वाशीतील रहेजा इमारतीत (Raheja Residency) लागलेल्या आगीत जैन कुटुंबातील कमल जैन (Kamal Jain) आणि बाळकृष्णन (Balakrishnan) कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. तर कामोठे येथील इमारतीत लागलेल्या आगीत सिसोदिया कुटुंबातील मायलेकींचा मृत्यू झाला. या घटनांमुळे शहरातील इमारतींच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement