5G Spectrum Auction : टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात भारताची प्रगती, 9 फ्रिक्वेन्सी बँडचा होणार लिलाव
Continues below advertisement
टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात भारत आज प्रगतीचं आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. आजपासून 5-जी स्पेक्ट्रमच्या 9 फ्रिक्वेन्सी बँडचा लिलाव करण्यात येणार आहे. एअरटेल, अदानी डेटा, जिओ आणि व्होडाफोन-आयडिया यासारख्या कंपन्या या लिलावासाठी शर्यतीत आहेत. 5-जी सुरू झाल्यास इंटरनेट सेवेचा वेग वाढणार आहे मात्र त्यासाठी ग्राहकांना अधिक किंमत मोजावी लागणार आहे... सध्या ट्रायकडून भोपाळ, नवी दिल्ली विमानतळ, कांडला पोर्ट आणि बंगळुरु या चार ठिकाणी 5 जीच्या पायलट चाचण्याही सुरू करण्यात आल्या आहेत.
Continues below advertisement