ABP News

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात आतापर्यंत 56 टक्के कमी पाऊस

Continues below advertisement

महाराष्ट्रावर आलेल्या मोठ्या संकटाच्या बातमीने... नजर जाईल तिथवर फक्त उन्हाच्या झळा, भेगाळलेली जमीन, बांधावरचं गवतही वाळलेलं, अर्धमेली झालेली पिकं, पोट खपाटीला गेलेली जनावरं, गावोगावी तहानलेली माणसं... आणि धूर टाकत धावणारे पाण्याचे टँकर... हे वर्णन उन्हाळ्यातलं नाहीय... तर महाराष्ट्रात ही परिस्थिती निर्माण झालीय, ऐन पावसाळ्यात, तेही श्रावण महिन्यात... जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडला, त्यानंतर मात्र वरूणराजाने जी पाठ फिरवली, ती ऑगस्ट महिना संपत आला तरी ती तशीच आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा ५६ टक्के कमी पाऊस झालाय. त्याच चिंतेची गोष्ट ही की, सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला पाऊस रुसलेलाच राहणारेय. त्यामुळे, पिकांचं तर पिकांचं, मात्र पिण्याच्या पाण्याचीही भ्रांत निर्माण झालीय. पेरलेलं बियाणं मातीआड गेलं आणि त्याचे कोंब काही उगवलेच नाहीत. आणि जिथं उगवले ते करपूनही गेले. धक्कादायक गोष्ट ही की, पावसाळ्याचा अवघा एकच महिला उरलेला असताना, पाऊस अजून रुसलेलाच आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram