50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?

Continues below advertisement

50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?

मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून खास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आजपासून १९ जानेवारीपर्यंत वानखेडेवर सुवर्णमहोत्सवी सप्ताह साजरा होणार आहे. यानिमित्तानं आज पहिल्या दिवशी भारताचे माजी कसोटीवीर सुनील गावस्कर यांच्या हस्ते मुंबईच्या आजवरच्या कर्णधारांचा सन्मान करण्यात आला. त्यात माजी कसोटीवीर चंद्रकांत पंडित, वासिम जाफर, निलेश कुलकर्णी, संजय मांजरेकरल लालचंद राजपूत, विनोद कांबळी अशा दिग्गजांचा समावेश होता. १९७४ साली वानखेडे स्टेडियमच्या उभारणीला सुरुवात झाली होती. तर जानेवारी १९७५ मध्ये वानखेडेवर पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता.  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram