ABP Majha Headlines : 05 PM : 31 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

लोकसभा निवडणुकीची मॅच मोदींनी फिक्स केली, राहुल गांधींचा आरोप. अंपायर आपणच नेमले, विरोधकांच्या दोन खेळाडूंना अटक केली असाही आरोप

ईव्हीएम आणि मॅच फिक्सिंग शिवाय भाजपला 180 जागा जिंकणं सुद्धा अशक्य, राहुल गांधींचं आव्हान, प्रेस आणि सोशल मीडियावर भाजपचा दबाव असा आरोप

केजरीवाल यांच्यावरील कारवाई म्हणजे संविधानावर हल्ला, आपल्याला संविधान वाचवण्यासाठी लढायचय. रामलीला मैदानातून पवारांचा भाजपवर हल्लाबोल. 

अबकी बार भाजप तडीपार.. दिल्लीच्या रामलीला मैदानावर उद्धव ठाकरेंची घोषणा.. निवडणूक प्रचारासाठी नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी आल्याचं विधान

दिल्लीच्या रामलीला मैदानावर विरोधी पक्षाची लोकतंत्र बचाओ रॅली, इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती

निवडणुकीच्या तोंडावर हेमंत सोरेन, केजरीवाल यांना अटक तर भाजपकडच्या ठगांवरील केसेस मागे.. ईडी कारवाईवरुन उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला.

मविआत समन्वय नाही, त्यांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर प़डतायत, प्रकाश आंबेडकरांची टीका.. काँग्रेसच्या पुढच्या पाच जागा स्पष्ट होतील तेव्हा पाठिंबा जाहीर करणार असल्याचं केलं स्पष्ट...

नाराजी नाट्यानंतर अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंची घेतली भेट, उमेदवारी मिळालेल्या चंद्रकांत खैरेंना दिल्या शुभेच्छा

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेवरुन महायुतीत रस्सीखेच, मुख्यमंत्री आणि उदय सामंत यांची 'वर्षा'वर बैठक, रत्नागिरी- सिंधुदुर्गसाठी भाजप आग्रही तर शिवसेनाही ठाम

केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट. भागवत कराड संभाजीनगरमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक.

राष्ट्रपतींच्या हस्ते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार प्रदान, अडवाणींच्या निवासस्थानी जाऊन केला गौरव

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram