Audi E-Car Charger : बीकेसीत साडेचारशे किलोवॅटचे चाॅजर स्टेशन, भारतातील सर्वात जलद ई-कार
Continues below advertisement
आऊडीनं भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात आणखी एक क्रांतीकारी पाऊल टाकलं आहे. मुंबईच्या बीकेसीत असलेल्या पार्किंगमध्ये आऊडीनं साडेचारशे किलोवॅटचं शक्तिशाली चार्जिंग स्टेशन उभारलंय. या स्टेशनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा भारतातील सर्वात जलद ई-कार चार्जर आहे. या स्टेशनमध्ये कार बॅटरी केवळ २६ मिनिटांत ८० टक्क्यांंपर्यंत चार्ज होईल असा दावा आऊडीनं केला आहे. सध्या भारतात २० ते ६० किलोवॅटचे चार्जर उपलब्ध आहेत. तिथं ई-कार चार्ज होण्यासाठी किमान आठ तास लागतात. त्यामुळं आऊडीचा वेळेची बचत करणारा शक्तिशाली चार्जर ई-कार वापरकर्त्यांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. येत्या मार्च महिन्यापर्यंत आऊडीच्या भारतातील सर्व ग्राहकांसाठी ही सेवा विनामूल्य असणार आहे. इतर ई-कारधारकांना फास्ट चार्जरसाठी प्रति युनिट २१ रुपये मोजावे लागतील.
Continues below advertisement