Central Railway Megablock : मध्य रेल्वेवर 36 तासांचा मेगाब्लॉक, पाहा कधी कोणत्या गाड्या धावणार
Jumbo Mega Block : मध्य रेल्वेवर 36 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे आणि कळवा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर 36 तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक असेल. हा मेगा ब्लॉक 08 जानेवारी (शनिवार) रोजी दुपारी 02.00 ते 10 जानेवारी (सोमवार) रोजी सकाळी 02.00 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल.