Akhil Mishra : अभिनेते अखिल मिश्रा यांचं निधन, वयाच्या 58 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ABP Majha
अभिनेते अखिल मिश्रा यांचा राहत्या घरातच अपघाती मृत्यू झालाय.. मीरा रोडमधील घरात मिश्रा स्टुलावर चढून काहीतरी काम करत होते. त्यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर पडले, यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मिश्रा यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र काही मिनिटांत त्यांचा मृत्यू झाला. मिश्रा यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. मात्र थ्री इडियट्स या चित्रपटात त्यांनी साकारलेली लायब्रेरियनची भूमिका सर्वाधिक गाजली.