Mumbai Crime : 'निष्काळजीपणाने घेतला तरुणीचा बळी?; जबाबदार कोण? मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये काय घडलं?
Continues below advertisement
मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या (Shraddha Construction) निष्काळजीपणामुळे सिमेंट ब्लॉक पडून २२ वर्षीय संस्कृती अमीनचा (Sanskruti Amin) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार बाळा नर (Bala Nar) यांनी पोलीस आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. 'तिचा सकाळी नऊ वाजता मृत्यू झाला आणि पोलिसांना गुन्हा दाखल करण्यातच रात्री बारा एक वाजल्या, आरोपीला पाठीमागे घालण्याचा षड्यंत्र आहे का?' असा सवाल आमदार बाळा नर यांनी उपस्थित केला आहे. या घटनेनंतर तीन दिवसांनी दोघांना अटक करण्यात आली असली तरी, मुख्य बिल्डरवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न कुटुंबीय विचारत आहेत. संस्कृतीच्या मृत्यूमुळे अमीन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या प्रकरणाच्या पारदर्शक चौकशीची मागणी जोर धरत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement