Dombivili Local | लोकलमधून पडून 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
डोंबिवलीच्या नवनीत नगरमध्ये आई आणि दोन भावांसोबत राहणारी चार्मी ही नुकतीच ग्रॅज्युएट झाली होती आणि घाटकोपरच्या खासगी कंपनीत नोकरीला लागली होती. रोजच्या प्रमाणे आजही तिने डोंबिवली स्थानकातून सकाळी 8.52 ची सीएसटी फास्ट लोकल पकडली, मात्र गर्दीमुळे तिला आत जाताच आलं नाही. अखेर दारात लटकलेल्या चार्मीचा कोपर रेल्वे स्थानकाजवळ तोल गेला आणि ती खाली कोसळली, या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.